स्वातंत्र्याची ७५ री
१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्याला स्वातंत्र प्राप्त झाले.इंग्रजांच्या जोखडातून भारत भू मुक्त झाली. आज २०२२ मध्ये स्वातंत्र्याची ७५ वर्षे आपण उत्साहाने साजरी करत आहोत.खरोकर ७५ वर्षानंतर आपण मागे वळून पहिले तर आपल्याला काय दीसून येईल याचा विचार आपण केला आहे का.
माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांनी २०२० मध्ये भारत जागतिक महा सत्ता बनवण्याचे स्वप्न पहिले. ते देखील अपूर्ण आहे.आज आपण अनेक क्षेत्रात जगात आपला ठसा उमटवला आहे.पण आपल्याला काही क्षेत्रात अजूनही काम करणे गरजेचे आहे.
७५ वर्षा नंतर ही काही गाव असे आहेत तिथे रस्ते पाणी वीज या मुलभूत सुविधांची वानवा आहे.या सुविधा गरजेच्या आहेत.रस्ते नाहीत म्हणून अनेकांचे प्राण जातात.धरणे बाजूला असून पाणी महनागरात जाते धरणा शेजारील मात्र पाण्या साठी वणवण भटकतो.