माझा महाराष्ट्र
निर्मिती :- १ मे १९६०
राजधानी : - मुंबई
उपराजधानी :- नागपूर
राज्य भाषा :- मराठी
राज्य फळ :-आंबा
राज्य पक्षी :-हारावत
राज्य प्राणी :-शेकरू
राज्य फुल :- मोठा बोंडारा किंवा ताम्हण
राज्य खेळ :- कबड्डी
राज्य गीत :- जय जय महाराष्ट्र माझा
राज्य नृत्य :- लावणी
जगप्रसिद्ध भारत वर्षातील महाराष्ट्र
हे एक महान सांस्कृतिक परंपरा लाभलेले वैभवशाली राज्य आहे.गड किल्ले ,तीर्थक्षेत्र
,मंदिरे ,कोरीव लेणी , नैसर्गिक सुंदर सागर किनारे , अभयारण्ये यांची रेलचेल महाराष्ट्रात
पाहायला मिळते .
महाराष्ट्राला जगद्गुरू संत तुकाराम , संत ज्ञानेश्वर , संत चोखामेळा , संत एकनाथ , संत नामदेव ,संत गाडगेबाबा यांसारख्या अनेक संतांचा वारसा लाभला आहे म्हणूनच आपल्या राज्यास संतांची भूमी असे देखील म्हटले जाते.म्हणूनअसेम्हटले जाते की
संतानी लोकोधाराचे महान मंदिर महाराष्ट्रात उभारले त्याचा पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला . संत नामदेवांनी त्याच्या भिंती बांधल्या. संत एकनाथांनी त्यावर घुमट चढवला . तुकोबा त्याचे कळस झाले आणि संत गाडगेबाबांनी त्या कळसावर पताका फडकावली.

No comments:
Post a Comment